Alandi News :’चला एक पाऊल सिध्दबेटाकडे’ अभियानात मुख्याधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांचा सहभाग

एमपीसी न्यूज- ‘चला एक पाऊल सिध्दबेटा कडे’ या आळंदीकरांच्या अभियानात काल (दि.23)रोजी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या सह माजी नगरसेवक व काही ज्येष्ठ पत्रकार बांधव ही यात (Alandi News) सहभागी झाले होते.त्यांनी येथील परिसराची संपूर्ण पाहणी केली.
एका खासगी संस्थेच्या माध्यमातून येथे माऊलींच्या चरित्रा संबंधित प्रासंगिक चित्रे इ. विकास कामे होणार आहेत.याबाबत करारनामा ही झाला आहे.तसेच येथील खबरदारी साठी योग्य अशा पालिकेमार्फत उपाय योजना केल्या जातील याची माहिती उपस्थितां पैकी इंद्रायणी फाऊंडेशन चे अध्यक्ष विठ्ठल शिंदे (Alandi News ) यांनी दिली.
Pune News : बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे अभिवादन
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे वास्तव असलेली कर्मभूमी ,लिलाभूमी म्हणजे सिध्दबेट होय. या भूमीच्या भेटीसाठी भाविकांची कार्तिकी ,आषाढी वारीला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.तसेच अनेक भाविक ,पर्यटक या भूमीचे महत्व जाणून येथील संत निवृत्तीनाथ , संत ज्ञानेश्वर महाराज ,संत सोपान देव व संत मुक्ताई यांच्या पर्णकुटीकेचे तसेच पूर्वीच्या ऋषी मुनींच्या तपाने व पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचे दर्शन घेण्यासाठी येथे येत असतात.