Alandi News: बहीण मुक्ताई कडून माऊलींस राखी

एमपीसी न्यूज: बहीण :भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. (Alandi News) या पवित्र धाग्याचे नाते जपत मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईबाई संस्थांच्या वतीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना दरवर्षी राखी पाठवण्याची परंपरा आहे. या वर्षीही संस्थांनानेही परंपरा कायम ठेवली आहे.

Pune Easebuzz: ईझबझला आरबीआयकडून पेमेंट अ‍ॅग्रीग्रेशन अथोरायझेशनसाठी तत्वतः मंजुरी

गेल्या अनेक वर्षांपासुन श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे तिघे देवरुपी संत भावंडांना नारळीपैार्णिमा, रक्षाबंधन निमित्त राखी अर्पण करण्यात येते. आज दि.11  ऑगस्ट रोजी पहाटे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांवर अभिषेक श्री मुक्ताई देवस्थान चे  विश्वस्त श्री संदीप रविंद्र पाटील, सौ अंकीता संदीप पाटील यांनी केला व माऊलींच्या समाधीवर राखी अर्पण केली. श्री संत ज्ञानेश्वर माऊलीं तर्फे मुक्ताबाईला साडी चोळी भेट म्हणून मिळाली.(Alandi News) यावेळी विशाल महाराज खोले, दिपक महाराज, सागर महाराज, गणेश महाराज, व आदी वारकरी उपस्थित होते.याबाबत माहिती आळंदी संस्थांनचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.