Alandi News : आळंदी मध्ये शिवजयंती निमित्त नितीन बानुगडे पाटील यांचे शिवव्याख्यान

शिव व्याख्यानाला हजारो शिवप्रेमींची गर्दी

एमपीसी न्यूज -काल (दि.19) आळंदी येथे (Alandi News) श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य शिवजयंती सोहळ्याचे  स्वराज्य ग्रुप, समस्त ग्रामस्थ आळंदी यांच्या तर्फे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने प्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानुगडे यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले होते.शिव व्याख्यानाला हजारो नागरिकांची यावेळी गर्दी होती.

 

 

 

 

 

Today’s Horoscope 20 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

शिवव्याख्यानापूर्वी ज्ञानेश्वर मेश्राम यांनी विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती तर अवधूत गांधी यांनी शिवबा राजं हे गीत गायले.शिवबा राजं या गीताला हजारो शिवप्रेमीची दाद मिळाली.आणि पुन्हा एकदा शिव प्रेमींच्या आग्रहा खातर त्यांनी ते गीत गायले.तद्नंतर या कार्यक्रमात आमदार सचिन अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या उपस्थित येथे एनबेल संस्थेच्या दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर इ. वस्तूंचे वाटप करण्यात आले.तसेच स्वराज्य ग्रुप तर्फे अनेक मान्यवरांचा येथे सत्कार करण्यात आला.

 

यावेळी शांतिब्रम्ह मारोती महाराज कु-हेकर, आमदार दिलीप मोहिते पाटील,शिक्षण आधिकारी भाऊसाहेब कारेकर, वरिष्ठ पोलीस आधिकारी सुनील गोडसे, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे,माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर,माजी नगरसेविका विनया तापकीर ,बाळासाहेब ठाकूर,अक्षय जाधव,अनिल बाबा राक्षे,कुणाल तापकीर,आनंदराव मुंगसे,एम डी पाखरे,श्रीकांत बोरावके,आरिफ शेख, दिनेश कुऱ्हाडे स्वराज्य ग्रुप चे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.या आयोजित कार्यक्रमाची माहिती चारुदत्त रंधवे (Alandi News)यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.