Alandi News : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची भव्य शोभायात्रा

एमपीसी न्यूज – आळंदी मध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या(Alandi News) वतीने काल (दि.30) रोजी भव्य श्रीराम जन्मोत्सव व भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले होते.यानिमित्ताने दु .12 वा.प्रभू श्रीराम अभिषेक, श्रीरामरक्षा पठण, श्रींचा पाळणा, दु.12:30 ला प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
Today’s Horoscope 31 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
तसेच संध्याकाळी श्रीराम चित्ररथाची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.या शोभा यात्रेचा प्रारंभ चाकण चौकापासून करण्यात आला होता.या भव्य शोभा यात्रेत हजारो रामभक्त सहभागी झाले होते. ते श्रीरामाचा जयघोष करत नृत्यात दंग झालेले दिसून आले.या शोभायात्रेत आकर्षक अश्या विद्युत रोषणाईसह फटाक्यांची अतिषबाजी केली गेली.आळंदी पोलीस व दिघी आळंदी वाहतूक विभाग यांचे या शोभा यात्रेला बहुमूल्य सहकार्य लाभले.
श्रीराम नवमी निमित्त श्री नृसिंह मठात चंदन उटीद्वारे स्वामींच्या समाधीवर (Alandi News) शिंदेशाही रूप साकारले होते.तर संत गोरोबाबा काका मंदिरात श्री रामेश्वर लिंग स्थापना साकारण्यात आली होती.