Alandi News : अवैधरित्या दारू विकणा-यांवर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – अवैधरित्या दारू विक्री करणा-या दोघांवर आळंदी येथे कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाख 16 हजारांची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 17) दुपारी चावडी चौक, वहिले आळी आळंदी येथे करण्यात आली.

कौस्तुभ दिलीप दौंडकर (वय 32, रा. वहिले आळी, चावडी चौक, आळंदी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह शेफे वाईन्सचा चालक मालक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कौस्तुभ हा त्याच्या घरात दारूसाठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कौस्तुभ याच्या घरावर छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी दोन हजार 660 रुपये रोख रक्कम आणि एक लाख 16 हजार 160 रुपये किमतीची देशी विदेशी दारू जप्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.