Alandi news: पोलीस व अग्निशमन दलांच्या कर्मचाऱ्यांना तेजस्विनी संस्थेच्या महिलांनी बांधली राखी

एमपीसी न्यूज: कोरोनाच्या काळात महत्वपूर्ण भूमिका बजवणारे तसेच नागरिकांच्या संरक्षण कार्यासाठी नेहमीच तत्पर असलेले पोलीस कर्मचारी व आळंदीसह (Alandi news) विविध ठिकाणी कार्यक्षम असणारे अग्निशमन दलाचे कर्मचारी यांना आज दि.12 रोजी सायंकाळी आळंदी पोलीस ठाण्यात तेजस्वीनी महिला विकास संस्था या बचत गटातर्फ राखी बांधण्यात आली.

मागील दोन वर्ष कोरोनारुपी संसर्गजन्य रोगाचे संकट असल्याने त्यावेळी शासनाचे नियम अटींचे निर्बंध होते. त्यामुळे रक्षाबंधन सणासही मर्यादेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी मात्र शासनाचे त्याबाबतीत कुठलेही निर्बंध नसल्याने देशात विविध ठिकाणी रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा होत आहे.

Pimpri News : मुळशी धरणातून पाणी विसर्ग वाढविला; 11,400 क्युसेकने विसर्ग

कोरोनाच्या काळात महत्वपूर्ण भूमिका बजवणारे तसेच नागरिकांच्या संरक्षण कार्यासाठी नेहमीच तत्पर असलेले पोलीस कर्मचारी व आळंदीसह विविध ठिकाणी कार्यक्षम असणारे आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी यांना आज दि.12 रोजी सायंकाळी आळंदी पोलीस (Alandi news) ठाण्यात तेजस्वीनी महिला विकास संस्था या बचत गटा तर्फे रुपाली पानसरे(अध्यक्षा) ,राणी रंधवे,वैष्णवी रंधवे,दमयंती कुऱ्हाडे या भगिनीनी त्यांना राखी बांधली.

यावेळी पोलीस अधिकारी पाटील साहेब,मच्छिंद्र शेंडे साहेब यासह आळंदी पोलीस कर्मचारी वर्ग व अग्निशमन दलाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.