Alandi News :संत तुकाराम यांच्या पत्नी जिजाबाई यांचे ही मंदिर देहूमध्ये उभारावे-मारोती महाराज कुऱ्हेकर

एमपीसी न्यूज – संत तुकाराम यांच्या पत्नी जिजाबाई यांचे ही मंदिर देहू (Alandi News) मध्ये उभारावे अशी इच्छा शांतिब्रम्ह मारोती महाराज कुऱ्हेकर प्रकट केली आहे.
आळंदी येथील इंद्रायणी घाटावर सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे. काल (दि.31 जानेवारी) या महोत्सवात करुणाकल्पतरू (वै.गु.नथुसिंग बाबा राजपूत यांचे चरित्र) लेखक आचार्य निधिज्ञानेश माऊलीं व श्री ज्ञानेश्वर दिग्विजय (श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र)लेखक श्याम गजानन महाराज जुनघरे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी शांतिब्रम्ह मारोती महाराज कुऱ्हेकर यांनी संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, चांगदेव यांच्या जीवनचरित्रातील काही प्रसंग भाग सांगितले .तसेच संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर हरी भजन करत असताना ,त्यांची पत्नी जिजाबाई जेव्हा त्यांच्याकडे भाकरी घेऊन जात असतात तेव्हा त्यांच्या पायात काटा रुतो तो काटा श्री भगवान विठ्ठल काढतात या प्रसंगाचे वर्णन केले.यावरून संसारातले स्त्रीशक्तीचे महत्व त्यांनी सांगितले.
तसेच त्यांनी संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभारण्याच्या कामाचे कौतुक केले. संत तुकाराम यांच्या पत्नी जिजाबाई यांचे ही मंदिर देहू (Alandi News) मध्ये उभारावे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
तसेच त्यांनी ईश्वर दर्शन,ईश्वर प्राप्ती,सद्गुरू कृपा,आत्मज्ञान, भक्ती याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.लक्षण आणि भावना यामधील फरक समजून सांगितला.संत अनुभव ,संत संगती,मानवी जीवनाचा उद्धार (Alandi News) याविषयी सांगितले.