Alandi News : ही हिमनदी नाही…ही तर आहे इंद्रायणी नदी

एमपीसी न्यूज- वाहणारे काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त सांडपाणी, त्या पाण्यावर तरंगणारा रसायनयुक्त फेस हे वर्णन कुठल्या गटारीचे नाही तर आपल्या भागातील पवित्र अश्या इंद्रायणी नदीचे आहे.पिंपरी चिंचवड पालिका हद्दीतून  तसेच इंद्रायणी नदी  काठच्या गावातून,कारखान्यातून इंद्रायणी नदीत मैलामिश्रित रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडत असल्याने सलग दोन दिवस आळंदी येथील नदीपात्र मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त सांड पाण्यामुळे (Alandi News) फेसाळले आहे.

हे तरंगणारे फेस पाहून बर्फाच्छादित भागाची आठवण झाल्या खेरीज राहत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात येथील नदीपात्र रसायनयुक्त सांडपाण्यामुळे फेसाळलेले आहे.  नदीकाठच्या गावातून पालिका ग्रामपंचायत

कुठलीही  मैलामिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते सांडपाणी नदीपात्रात सोडतात. तसेच काही कारखानदार सुध्दा त्यांच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी हे शुध्द होण्यासाठी असणारी, प्रक्रिया न करताच ते रसायनयुक्त पाणी तसेच नदीपात्रात सोडत असल्याने इंद्रायणी नदीने सद्यस्थितीत गटारीचे रूप धारण केले आहे.

Mahalunge Crime News : कंत्राट मिळविण्यासाठी कंपनीवर दबाव आणणाऱ्यांवर गुन्हा

या नदी पात्रातील मैलामिश्रित रसायनयुक्त पाण्याने जलचर जीव सृष्टी धोक्यात आलीच आहे. परंतु हे नदीपात्रातील मैलामिश्रित रसायनयुक्त पाणी  शेती पंपाद्वारे शेतात नेऊन पिकांना दिले जाते.त्या पिकांवर व ती पिके खाणाऱ्या मानवासह इतर पशु पक्षी प्राण्यांवर दुरोगामी दुष्परिणाम होऊन अनेक रोगांना ते बळी (Alandi News) पडतात.अशा पाण्यात स्नान केले तर  त्वचा रोग संभवतात. या नदीपात्रातील पाणी पूर्णपणे प्रदूषित झाल्याने हे पाणी पिण्यास शासनानेच मनाई केली आहे.

या जलप्रदूषणाच्या नदी काठी,जवळ असणाऱ्या विहिरी ,कुपनलिकांच्या पाण्यात सुद्धा दुष्परिणाम होत आहेत.हे नदी पात्रातील जलप्रदूषण पाहिल्यानंतर अनेकांनी त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे या होत असलेल्या मोठ्या जलप्रदूषणा कडे लक्ष जाणार तरी कधी?या जलप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करणार तरी कधी?अशी विचारणा येथील नागरिकांकडून होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.