Alandi News : ट्रक चालकाने परस्पर विकला सव्वा लाखांचा माल

एमपीसी न्यूज – ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकवर काम करत असलेल्या ट्रक चालकाने एक लाख 28 हजारांचे पाईप विकले. याप्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 19 फेब्रुवारी रोजी आळंदी येथे उघडकीस आली.

संतु फकिरा गायकवाड (वय 46, रा. बो-हाडेवाडी, मोशी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अशोक सुरेश म्हस्कर (वय 24, रा. बेलवाडी, पोस्ट पिंपळनेर ता. जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड यांचा ओम रोडवेज नावाचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या एम एच 14 / ए एस 8512 या ट्रकवर आरोपी अशोक म्हस्कर हा चार महिन्यांपासून काम करत होता. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता शिरवळ, सातारा येथील टुब इंन्वेसमेंट ऑफ इंडिया लि. या कंपनीत अशोक ट्रक घेऊन गेला. कंपनीतून लोखंडी पाईप भरून त्याने रस्त्यात त्यातील एक लाख 28 हजारांचे 707 पाईप विकले. याप्रकरणी कामगार अशोक याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.