Alandi News: किन्नर बनून राहण्यासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

आरोपी संचिता किन्नर आहे. फिर्यादी यांचा लहान भाऊ अवधूत याला आरोपींनी किन्नर बनून राहण्यास भाग पाडून त्याचा छळ केला.

एमपीसी न्यूज – किन्नर बनून राहण्यासाठी दोघांनी मिळून एकाचा छळ केला. त्याला कंटाळून पीडित व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवधूत मोहोड (वय 30, रा. गणोजा, ता. भातकुली, जि. अमरावती) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अवधूत यांचे भाऊ हरिहर सुरेश मोहोड (वय 32) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संचिता जितेंद्र पाटील उर्फ संदीप गि-हे, जितेंद्र पाटील (दोघे रा. शिरूर घोडनदी काचाळी, ता. शिरूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संचिता किन्नर आहे. फिर्यादी यांचा लहान भाऊ अवधूत याला आरोपींनी किन्नर बनून राहण्यास भाग पाडून त्याचा छळ केला. आरोपींच्या त्रासाला कंटाळून अवधूत याने 6 ऑगस्ट रोजी दुपारी खेड तालुक्यातील कोयाळी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.

अवधूत याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये आरोपी संचिता आणि जितेंद्र हे दोघे त्याला किन्नर बनून राहण्यासाठी भाग पाडत असल्याचे म्हटले होते. त्यावरून संचिता आणि जितेंद्र यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.