Alandi News : भामा आसखेड येथील पाणीपुरवठा आळंदीस सुरळीतपणे सुरू

एमपीसी न्यूज -काल (दि.21 मार्च ) दुपारी 2:40 वा. आळंदी शहरात पाणीपुरवठा (Alandi News) करणाऱ्या भामा आसखेड धरणातील जॅकवेलला विद्युत पुरवठा करणाऱ्या केबल मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. पुणे शहरात आणि पर्यायाने आळंदी शहरास होणारा पाणीपुरवठा तात्पुरता स्वरूपात खंडित झाला होता.

 

सदर तांत्रिक बिघाड दुरुस्तीच काम पुणे मनपा मार्फत सुरू करण्यात आले होते.तरी आळंदीकर नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन पालिके तर्फे करण्यात आले होते.रात्री साडेतीन च्या दरम्यान तेथील दुरुस्ती चे काम पूर्ण झाले असून भामा आसखेड चे पाणी  पाइपलाइन द्वारे सुरळीतपणे आळंदी शहराला सुरू झाले आहे.

 

Pune Crime News : चहा सांडल्याच्या वादातून तरुणावर धारधार शस्त्राने वार

 

 

 

आज (दि.22) आळंदी ता. हवेली या भागात  पाणीपुरवठा सुरू राहणार असून उर्वरित राहिलेला (अलीकडील) कालचा टप्पा आळंदी हवेली(नदीपलीकडील) विभागतील पाणीपुरवठा झाल्यानंतर  करण्यात येणार आहे.याबाबत माहिती पाणीपुरवठा (Alandi News) आधिकारी अक्षय शिरगिरे यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.