Alandi: सकल मराठा समाज आळंदी देवाची यांच्या वतीने 14 तारखेला आळंदी बाजार पेठ बंद चे आवाहन

एमपीसी न्यूज – राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Alandi)गेल्या तीन दिवसांपासून उपोषण करत आहेत.
त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून‌ बुधवार दि.14 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यानिमित्ताने आळंदी देवाची बाजार पेठ  बंद ठेवण्याचे आवाहन  सकल मराठा समाज आळंदी देवाची यांच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत बैठक आळंदी मध्ये आयोजित करण्यात आली होती.तद्नंतर दि .14 रोजी (Alandi)आळंदी देवाची बाजार पेठ  बंद ठेवण्याचे निवेदन आळंदी पोलीस चौकी मध्ये देण्यात आले.या निवेदनात संतोष भोसले,प्रकाश कुऱ्हाडे,आनंदराव मुंगसे,अरुण कुरे,सचिन गिलबिले,दिनेश घुले,प्रशांत कुऱ्हाडे,राजू दिवाणे,सागर भोसले,श्रीकांत काकडे,जयसिंह कदम,अर्जुन मेदनकर,शशिकांत जाधव,उमेश कुऱ्हाडे ,रोहन कुऱ्हाडे,दिनेश कुऱ्हाडे,अशोक पाटील रंधवे,संतोष वायाळ यांची  नावे आहेत.तर डी डी भोसले ,भागवत शेजुळ यांनी सुद्धा उपस्थिती असल्याचे सकल मराठा समाज आळंदी देवाची यांनी सांगितले.
14 तारखेला सकल मराठा समाज आळंदी देवाची यांच्या वतीने आळंदी बाजार पेठ बंद चे आवाहन करण्यात आले .

 

 

https://www.youtube.com/watch?v=4so19cObrrw&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.