गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Alandi : माघी गणेश जयंती निमित्त थेऊरमध्ये चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील (Alandi) चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या माघी गणेश जयंती निमित्त श्री क्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

गणेश जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिरात व मंदिरा बाहेरील परिसरात विद्युत रोषणाई चिंचवड देवस्थान वतीने करण्यात आली आहे. मंदिर प्रांगणात रंगीबेरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच फुलांची आकर्षक फुलसजावट करण्यात आली होती.

श्रींच्या मूर्तीला भरजरी पोशाख व दागिने घालण्यात आले होते. थेऊर (Alandi) येथील प्रासादिक भजनी मंडळ आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळांचा संध्याकाळी भजनांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परंपरेप्रमाणे प्रकाश महाराज देव हिंजवडीकर आणि पिरंगुटकर देव मंडळीपैकी अरुण महाराज देव, शशांक देव, नारायण देव आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत.

Maval News : भरधाव दुचाकी चालवणे 16 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतले

पिरंगुटवरून सद्गुरू मोरया गोसावी यांच्या पूजेतील मूर्ती घेऊन श्री चिंतामणी भेटीस येतात. त्यावेळी चिंतामणीला अभिषेक महापूजा करण्यात येते. रात्री श्रींचा छबिना निघाल्यानंतर सद्गुरू मोरया गोसावी, श्री चिंतामणी महाराज रचित एकवीस पदांच्या धुपारतीचा कार्यक्रम पहाटेपर्यंत चालतो. सर्व व्यवस्थेवर चिंचवड देवस्थानचे विश्वस्त हभप आनंद महाराज तांबे लक्ष ठेवून होते.

 

Latest news
Related news