Alandi :श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर की रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान

एमपीसी न्यूज- जैन स्थानकवासी संघ यांच्या वतीने आळंदी देवाची या ठिकाणी “महावीर की रोटी” या उपक्रमांतर्गत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ राज्य कार्यकारिणी सदस्य अजित वडगांवकर व परिवाराच्या वतीने माऊलींच्या दर्शनाला आलेल्या शंभर भाविक भक्तांना अजित वडगांवकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाप्रसाद अन्नवाटप(Alandi) करण्यात आले.

 

याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे तुकाराम माने,जैन संघाचे उपाध्यक्ष सतीश चोरडिया, राजेंद्र धोका, विश्वस्त राजेंद्र लोढा,सागर बागमार, किरण लोढा, राजेंद्र चोपडा, मदनलाल बोरुंदिया, मोहनलाल चोपडा ,पत्रकार गौतम पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ राज्य कार्यकारिणी सदस्य अजित वडगांवकर यांचा वाढदिवस दरवर्षी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, संस्थेच्या सर्व विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहात साजरा करत साजरा करत असतात.
यावर्षीही अजित वडगांवकर यांच्या  वाढदिवसानिमित्त  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा अभिषेक करण्यात आला.तसेच  गुरुवर्य ह.भ.प. डॉ. नारायण म.जाधव यांनी शुभ आशीर्वाद दिले.श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सभागृहामध्ये कार्यक्रम प्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, खजिनदार डॉ.दीपक पाटील, विश्वस्त व ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे,  राजेश नागरे, तुकाराम गवारी, राजाराम मस्के, अंकुश बोडके, संदेश नवले, चांगदेव वाकडकर उपस्थित होते.

तसेच, अविनाश पारखी, बाबाजी कुऱ्हाडे,संस्थेचे सभासद अनिल वडगांवकर, शाम पवार, हनुमंत तापकीर,चरित्र समितीचे पदाधिकारी विश्वंभर पाटील सदस्य ज्ञानेश्वर जाधव, धनाजी काळे, चंद्रकांत गोरे,सुखदेव जाधव, सखाराम मुरकुट,सिद्धेश्वर म्हस्के, सर्व विभागातील मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

माऊलींच्या मूर्तीच्या पूजनाने व दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य दीपक मुंगसे यांनी प्रास्ताविकाद्वारे संस्थेच्या उभारणीमध्ये अजित वडगांवकर यांचा असलेला अनमोल सहभाग व त्यांच्या अंगी असलेले गुण व त्यांचे  कार्याविषयी माहिती दिली. प्रशालेतील शिक्षिकांच्या हस्ते अजित वडगांवकर यांचे औक्षण करण्यात आले. केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

 

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था,श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र  समिती, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ (अर्जुन मेदनकर),श्री ज्ञानेश्वर विद्यालय ज्युनि. कॉलेज,श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर, श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर प्रशालांतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अजित वडगांवकर यांचा सन्मान करण्यात आला. संस्था अध्यक्ष सुरेश वडगांवकर यांनी आपल्या मनोगतात त्यांचे सुपुत्र व संस्थेचे सचिव यांच्या आयुष्यातील घटना भावूक होत सांगत त्यांना मनापासून खूप आशीर्वाद दिले.

खजिनदार दीपक पाटील यांनी मित्रत्वाच्या नात्याने अजित वडगांवकर यांच्या अंगी असणारे चिकाटी, धैर्य या गुणांची स्तुती केली. प्रकाश काळे यांनी अजित या नावाचा अर्थ विशद करत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचा महाराष्ट्रभर नावलौकिक केल्याबद्दल कौतुक केले. गुट्टे सर,शिक्षकेतर प्रतिनिधी शिवाजी जाधव यांनी वाढदिवसाच्यानिम्मित शुभेच्छा दिल्या.अजित वडगांवकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री आनंद पार्श्व गुरुकुल ,सोनेवाडी ,अहमदनगर प्रशालेस पाच हजार एक रुपयांची देणगी देण्यात आली.

या भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती सर यांनी केले. उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी मानले. संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेल्या पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.