Alandi Crime News : विनयभंग आणि मारहाण प्रकरणी एकाला अटक

ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी अकरा वाजता बटवाल वस्ती, चिंबळी येथे घडली. : One arrested for molestation and assault

 एमपीसी न्यूज – महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच महिलेच्या पतीला मारहाण केली. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी अकरा वाजता बटवाल वस्ती, चिंबळी येथे घडली.

ओंकार हिरामण जैद (रा. जैद वस्ती, चिंबळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी आरोपी फिर्यादी यांच्या घराच्या मागच्या बाजूला विजेच्या तारेवर आकड्याची वायर टाकत होता.

त्यावेळी फिर्यादी यांच्या पतीने आरोपीला आकड्याची वायर का लावतोस, अशी विचारणा केली.

त्यावरून आरोपीने फिर्यादी यांच्या पतीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्यासमोर अश्लील हातवारे करून त्यांचा विनयभंग केला.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.