Alandi News: महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक

Alandi: One arrested for molesting a woman आजीचा अंत्यविधीसाठी करून फिर्यादी महिला सोळू गावातील त्यांच्या मावस चुलत्यांच्या घरासमोर थांबल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी यांचे वडील आणि आरोपी यांच्यामध्ये पैशांच्या कारणांवरून वाद झाला.

एमपीसी न्यूज – महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच कोयता घेऊन महिलेला मारण्यासाठी धावून जाणा-या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील सोळू या गावात घडली.

संजय हिरामण कदम (वय 38, रा. निरगुडी, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आजीचे शनिवारी निधन झाले. आजीचा अंत्यविधीसाठी करून फिर्यादी महिला सोळू गावातील त्यांच्या मावस चुलत्यांच्या घरासमोर थांबल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी यांचे वडील आणि आरोपी यांच्यामध्ये पैशांच्या कारणांवरून वाद झाला. त्या वादातून आरोपीने फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन केले.

तसेच आरोपीने फिर्यादी यांना व त्यांच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तोडावर चापट मारून कोयता घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर मारण्याची धावून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.