Alandi : पिस्तूल व जीवंत काडतुस जवळ बाळगणाऱ्या एकाला अटक

Alandi: One arrested with pistol and live cartridges

एमपीसी न्यूज – विनापरवाना पिस्तूल आणि  जीवंत काडतुसे बेकायदेशीर रित्या जवळ बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला आळंदी येथील सटवाई मंदिराजवळून शनिवारी (दि.18) रात्री ताब्यात घेतले आहे. 

स्वागत नंदकुमार गोडसे  ( वय. 20, रा. सोळु, ता. खेड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस शिपाई त्रिनयन संजय बाळसराफ यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या या आरोपीने 41 हजार रुपये किमतीची विनापरवाना एक पिस्तूल व एक  जिवंत काडतुसे बेकायदेशीररित्या जवळ बाळगली होती. त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे बंदी आदेश न पाळल्यामुळे त्यालख आळंदी येथील सटवाई मंदिराजवळून   शनिवारी (दि.18) रात्री ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1