BNR-HDR-TOP-Mobile

Alandi : ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू; एकजण गंभीर

एमपीसी न्यूज – घाटातून समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करताना वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. यामध्ये कार झाडाला धडकली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून कारमधील एकाचा मृत्यू झाला. हा अपघात 8 जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास च-होली येथे वडगाव घेनंद घाटात झाला.

अर्जुन नाना साळवे (वय 45, रा. जाधवमळा, ता. शिरूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अर्जुन शंकर चव्हाण (वय 32, रा. रामलिंग, ता. शिरूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या विरोधात जिजाराम धावजी कारभळ (वय 23, रा. मरकळ, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून रोजी दुपारी अर्जुन चव्हाण आणि अर्जुन साळवे दोघेजण कारमधून (एमएच 12 / एल पी 8076) वडगाव घेनंद घाटातून जात होते. अर्जुन चव्हाण कार चालवत होता. घाटातून जात असताना समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा चव्हाण याने प्रयत्न केला. मात्र, समोरून वाहन आल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्याने विरुद्ध दिशेला कार नेली. त्यामुळे कार विरुद्ध दिशेला एका झाडाला धडकली.

या अपघातात अर्जुन साळवे गंभीर जखमी झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर, अर्जुन चव्हाण याला देखील गंभीर दुखापत झाली. याबाबत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण, आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.