Alandi : डंपरच्या धडकेत एकाचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरची एका दुचाकीला (Alandi Accident )धडक बसली, यामध्ये दुचाकीवरील सह प्रवाशाचा मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी दिनांक 28 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास वडगाव रोड, आळंदी येथे घडली.

तात्याभाऊ रावसाहेब धोत्रे (वय 76, रा. मरकळ रोड, आळंदी) असे मृत्यू झालेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. परमेश्वर बाळासाहेब धोत्रे (वय 53, रा. मरकळ रोड, आळंदी. मूळ रा. गेवराई, बीड) हे जखमी झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोपान लक्ष्मण काळे (वय 59, रा. कोयाळी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : मावळ चषक कुस्ती स्पर्धेत अजित करवंदे, सावरी सातकर यांनी मिळवल्या मानाच्या गदा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या ताब्यातील डंपर वडगाव बाजूकडून आळंदी चौकाकडे भरधाव वेगात घेऊन जात होता. तो अचानक अन्नपूर्णा मातानगरकडे जाणाऱ्या रस्त्याला वळाला. त्यावेळी डंपरची फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरात धडक बसली.

यामध्ये फिर्यादी यांच्या दुचाकीवरील सहप्रवाशी तात्याभाऊ हे रस्त्यावर पडले. त्यांच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर फिर्यादी यांच्या पायाला मार लागला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.