Alandi: आळंदीत भाजीपाला किराणा दुकाने दुपारी एकपर्यंतच चालू ठेवण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी, रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी आळंदी शहरातील सर्व भाजीपाला विक्री, किराणा माल विक्रीस उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. यानंतर दुकाने सुरु राहिल्यास आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिला आहे.  

खेड तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रक प्रमुख सुचित्रा आमले  व उपप्रमुख आपत्ती व्यवस्थापन सदस्य सचिव तथा मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी हे आदेश दिले आहेत.  हे आदेश 2  एप्रिलपासून पुढील आदेश होईपर्यंत कायम राहणार आहेत.

आळंदीत किराणा माल घरपोच सेवा सुरु आहे. नाहक रस्त्या होत असलेली गर्दी व रहदारी टाळण्यास उपाय म्हणू आदेश काढण्यात आले आहेत. नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये. तसेच साठेबाजी होऊ नये आणि नियमित पुरवठा सुरु रहावा यासाठी या आदेशाचा उपयोग होणार आहे.

दुपारी 1 नंतर दुकाने सुरु राहिल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.