Alandi : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान साडेचार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – पुणे ते आळंदी या मार्गावर पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी एका प्रवासी महिलेच्या पर्समधून सुमारे 4 लाख 52 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 28 जानेवारी 2020 रोजी घडला असून याप्रकरणी रविवारी (दि. 9) गुन्हा दाखल केला आहे.

अलका विलास ठाकूर (वय 54, रा. मीरा भाईंदर, ठाणे) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जानेवारी रोजी दुपारी साडेपाच ते सव्वा सहा या कालावधीत फिर्यादी अलका पुणे-आळंदी पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत होत्या. बस प्रवासादरम्यान अलका यांच्या पर्सची चेन उघडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 4 लाख 52 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.