Alandi : पोलीस कर्माचा-याला दमदाटी केल्याप्रकरणी दोघांना अटक

Police arrested two persons for assaulting staff

एमपीसी न्यूज – पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना दिवसा भर रस्त्यात खोदून रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याचे दिसले. त्यामुळे रस्त्याचे काम आत्ता न करता रात्री करायचे, असे पोलीस कर्माचा-याने सांगितले असता तिघांनी मिळून पोलीस कर्माचा-याला शिवीगाळ करत अंगावर धावून आले. तसेच दमदाटी केली. याबाबत गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.

ही घटना रविवारी (दि. 21) रात्री पावणे आठ वाजताच्या सुमरास आळंदी येथे घडली. सतीश बाजीराव लोखंडे, प्रसाद सतीश लोखंडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह आदित्य सुधीर लोखंडे याच्या विरोधात सरकारी कर्मात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई नितीन साळुंखे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस शिपाई नितीन साळुंखे हे त्यांच्या सहकारी पोलिसांसोबत आळंदी शहरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एका रस्त्यावर त्यांना जेसीबीच्या सहाय्याने खोडून दोन्ही बाजूला वाहने अडवली असल्याचे दिसले.

त्यामुळे पोलिसांनी खोदलेल्या ठिकाणी जाऊन आरोपींना ‘रस्त्याचे काम आत्ता कशाला करायचे, रात्री करायचे’ असे म्हटले.

यावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच दगड घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर धावून आला. आरोपींनी फिर्यादी यांना ‘येथून जाऊ देणार नाही’ अशी धमकी दिली.

याबाबत तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सतीश आणि प्रसाद यांना अटक केली आहे.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.