Alandi : बंदोबस्तावर असलेल्या पोलीस बांधवांसाठी पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचा पाणी वाटप उपक्रम

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांसाठी पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पाणी आणि थंड पेय वाटप करण्यात आले.

आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश कदम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी असोसिएशनचे पुणे जिल्हा संघटक विनेश भोजे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन लाड, प्रणव बुर्डे, मोशी शहर अध्यक्ष किशोर बोराटे, आळंदी शहर उपाध्यक्ष युवराज इंगळे, आळंदी शहर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुमित काटे, दिघी विभाग अध्यक्ष गिरीश राजूरकर आदी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. वाहतुकीत देखील बदल करण्यात आले आहेत. दिवसरात्र पोलीस बांधव नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहेत. पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून या पोलीस बांधवांसाठी एक उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये पाणी बॉटल आणि थंड पेय वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.