Alandi : शरद पवार यांच्या विरोधातील पत्रकाचा आळंदीमध्ये निषेध

एमपीसी न्यूज- शरद पवार हिंदुविरोधी असून त्यांना सद्गुरू जोग महाराज यांच्या पुण्यतिथी शताब्दी सोहळ्याला बोलावू नये अशा आशयाचे पत्र पंढरपूर येथील राष्ट्रीय वारकरी परिषदेने प्रसिद्ध केले होते. या पत्राचा आळंदीमध्ये तीव्र निषेध करण्यात आला.

आळंदीमध्ये सोमवारपासून सद्गुरू जोग महाराज यांच्या पुण्यतिथी शताब्दी सोहळ्यानिमित्त सप्ताह सुरु आहे. या सोहळ्यासाठी शरद पवार यांना बोलावू नये अशा आशयाचे पत्रक पंढरपूर येथे प्रसिद्धीस दिले होते. या पत्रकाचा वारकरी संप्रदायातून निषेध व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी डी डी भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे, उत्तम गोगावले, नियती शिंदे, निस्सार सय्यद, श्रीकांत काकडे, अविनाश धनवे यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे निवृत्ती महाराज वक्ते यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा मनस्थितीत असताना पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेतली.

दरम्यान, संदीपान महाराज शिंदे, बाजीराव चंदिले, तुकाराम महाराज मुळीक, त्र्यंबकराव गायकवाड, पोलीस चौकीत आले. त्यांनी शरद पवार यांच्याबाबत खुलासा करताना सांगितले की, यापूर्वी शरद पवार यांनी जोग महाराज संस्थेच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला न मागता १८ लाख रुपयांची देणगी दिली होती. संस्थेच्या नव्या इमारतीचे उदघाटन त्यांनी केले होते. मग त्यांना नास्तिक कसे म्हणता येईल ?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.