Alandi : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्त 31 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन आळंदी शहरात करण्यात आले होते. सकाळी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महिलांच्या वतीने प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे, भागवत काटकर, विष्णू कुऱ्हाडे, अजय तापकीर, राजेश दिवटे, संगीता फफाळ तसेच विविध पक्षांचे, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Pimpri : शहरात जोरदार गारपीटसह सोसाट्याचा वारा

रात्री पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चित्ररथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या विविध कार्यक्रमांचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती आळंदी देवाची यांनी केले होते.

4 जून रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी चारपर्यंत आळंदी शहरात त्यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.