Alandi rain : आळंदी मध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी

एमपीसी न्यूज : आळंदी येथे आज सायंकाळी विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या जोरदार पावसाने रस्त्यावरुन (Alandi rain) रहदारी करणाऱ्या दुचाकी स्वारांची तसेच कामानिमित्त घरा बाहेर पडलेल्या पायी चालणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Pune News: अन्न व औषध प्रशासनातर्फे पनीर विक्रेत्यावर कारवाई

आळंदी येथे आज सायंकाळी चार ते पावणे पाच वाजेपर्यंतच्या दरम्यान विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे येथील भैरवनाथ चौक, वडगांव रस्ता,मरकळ रस्ता,नगरपालिका चौक अश्या विविध ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते.(Alandi rain) विशेषतः वडगांव चौक ते हजेरी मारुती चौका पर्यंत पावसाचे पाणी मोठया प्रमाणात वाहत होते. त्यामुळे येथे वाहनचालकांना रस्त्यावरच्या पाण्यातून वाट काढावी लागत होती. अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.