Road accident : वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – आळंदी येथे वाहनाच्या धडकेत (Road accident) एका पदचार्‍याचा मृत्यू झाला आहे. वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाचा दुर्दवी मृत्यू झाला आहे.  हा अपघात 30 जूनला च-होली खुर्द बायपास रोड येथे घडला. 

या अपघातामध्ये पुरुषोत्तम नामदेव पायघन (वय 30)याचा मृत्यू झाला आहे. याबाबत देविदास नामदेव पायघन (वय 38, रा. देहू फाटा, मुळगाव बुलढाणा) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Vadgaon Maval – शंकरराव म्हाळस्कर यांचे निधन

पुरुषोत्तम हा 30 मे रोजी चऱ्होली बायपास रोड समोरील रायबा हॉटेल समोरून जात होता.  रस्त्याने पायी जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अद्यात वाहनाने त्याला ठोकर देऊन पलायन केले. (Road accident) यामुळे पुरुषोत्तम याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्यातच त्याचा मृत्यू झाला.  आळंदी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत असून फरार वाहन चालकाचा शोध सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.