Alandi : एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन यांचा आळंदी अभ्यास दौरा

एमपीसी न्यूज : आळंदी येथे एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन, निगडी (Alandi) यांनी आपल्या 100 विद्यार्थ्यांना कॉलेजमधील थेरी माहिती सोबतच फिल्डवरील माहिती व्हावी, यासाठी 23 मार्च आणि 24 मार्च असा 2 दिवसीय ‘आळंदी अभ्यास दौरा’ आयोजित केला होता.

सदरच्या 2 दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मंदिर परिसर, घाट परिसर, व्यापारी भाग व काही रहिवासी भाग यांची पाहणी केली. या अभ्यास दौऱ्याचा प्रमुख उद्दिष्ट सामाजिक-सांस्कृतिक पैलू, सौंदर्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि कार्ये यासह हवामान परिस्थिती, सेवा आणि त्या प्रदेशातील वास्तुशास्त्रीय घटकांवर कसा परिणाम होतो हे समजून घेणे हा होता अशी माहिती प्रियांका गजभर यांनी दिली.

Bhosari News – भोसरी एमआयडीसीमध्ये महावितरण कार्यालयाच्या बाहेर आंदोलन

या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी आळंदी शहरातील वास्तूशास्त्रनुसार महत्त्वाची असणाऱ्या अनेक (Alandi) ठिकाणांचा अभ्यास केला. या कार्यशाळेस आळंदी नगरपरिषद तसेच मंदिर समिती यांचे सहकार्य लाभले असून विद्यार्थ्यांना वास्तू शास्त्र विषयातील बारकावे लक्षात यावेत यासाठी कॉलेज मार्फत अश्या प्रकारच्या अभ्यास दौऱ्यांचे सातत्याने आयोजन केले जात असल्याची माहिती ‘एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन’च्या प्रियांका गजभर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.