Alandi : वाहतुकीस अडथळा करणाऱ्या चेंबरची समस्या सचिन गिलबिले यांनी सोडवली

एमपीसी न्यूज : आळंदी नगरपरिषद (Alandi) हद्दीतील साई समृद्धी सोसायटी, इंद्रायणीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चेंबर नादुरुस्त झाल्यामुळे वाहतुकीस अडथळा होत होता. सदर रस्ता हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीवरील रस्ता असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली जात नव्हती.

Pimpri News : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने बालचमू रमले रंगांच्या दुनियेत

सदरची तक्रार नागरिकांनी आळंदी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांना सांगितली असता त्यांनी त्या समस्येची तत्काळ दखल घेऊन स्व-खर्चातून चेंबर दुरूस्तीचे काम केले. याबाबतची माहिती सचिन गिलबिले यांनी दिली. या रस्त्यावरील चेंबर दुरुस्तीचे काम केल्याने येथून वाहने (Alandi) विना अडथळा रहदारी करू शकणार आहेत. तेथील समस्या तत्काळ सोडवल्याबद्दल त्यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.