Alandi : कोरोना; आळंदी रस्त्यावरील साई मंदिर भाविकांसाठी बंद

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणे, सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर आणि पुणे जिल्हा अधिकारी नवल किशोर राम यांनी केलेल्या आवाहनामुळे चऱ्होली, वडमुखवाडी येथील पुणे – आळंदी रस्त्यावरील श्री साई मंदिर आज मंगळवार (दि.17) पासून पुढील आदेश मिळेपर्यंत भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे.

श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे, विश्वस्त शिवकुमार नेलगे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. मंदिरातील नित्य पूजाविधी पुरोहित नेहमीप्रमाणे पार पडतील, असे नेलगे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.