Alandi : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ प्रस्थान सोहळ्यास सज्ज

एमपीसी न्यूज-कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ प्रस्थान सोहळ्यास सज्ज झाला असून या चांदीच्या रथाला मानकरी तुळशीराम भोसले व रोहित भोसले यांची (Alandi) मानाची बैलजोडी जुंपून आज (दि.2 जून ) सकाळी सराव करण्यात आला.भक्त निवास ते विश्रांवड ,विश्रांत वड ते भक्त निवास असा हा  सराव करण्यात आला.

Alandi : 500 तुळशी रोपांचे वाटप करून साजरे करण्यात आले वाढदिवस

यादरम्यान बैल समिती अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांच्या कुटुंबातील माता भगिनींनी या बैलांचे पूजन केले. यावेळी ग्रामस्थ ,देवस्थान कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान दि 11 जून ला आहे. दुसऱ्या दिवशी दि.12 जून ला सकाळी आळंदीतून सोहळा पंढरीच्या (Alandi) दिशेने मार्गस्थ होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.