Alandi : एमआयटी महाविद्यालयात विज्ञान सप्ताह 2023 उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – विज्ञान आणि संगणक विज्ञान विभाग, एमआयटी कला, (Alandi) वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आळंदीच्या वतीने, विज्ञान सप्ताह 2023 – Scifari 2.0   – “Exploring the extra ordinary ”  आयोजित केला गेला.

Alandi : भागवत एकादशीनिमित्त माऊलीं मंदिरात आकर्षक फुलसजावट

मराठी सिनेमा “सुभेदार” चे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर  यांच्या हस्ते Scifari 2.0 चे उद्घाटन करण्यात आले.यावेळी  निर्माते श्रमिक गोजमगुंडे, गायक अवधूत गांधी, तसेच कलाकार बिपीन सुर्वे हे उपस्थित होते.

सन्माननीय प्राचार्य डॉ. बी.बी. वाफारे , उपप्राचार्य, सर्व विभागांचे प्रमुख, सर्व शिक्षक, प्रायोजक, सर्व कार्यक्रम समन्वयक, विद्यार्थी समन्वयक, स्वयंसेवक आणि विविध महाविद्यालयातील विद्यार्थी उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते.

 

प्रथम दिवशी 7 स्पर्धांचे आयोजन  करण्यात आले होते ज्यात ट्रिव्हिया क्विझ, पुणे गॉट टॅलेंट (टॅलेंट फ्यूजन), लुडो, इनोव्हेटिव्ह रिसर्च आयडिया, टेबल टेनिस, ब्लाइंड कोडींग आणि बॉक्स क्रिकेट या स्पर्धांचा समावेश होता.

तसेच दुसऱ्या दिवशी 5 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात वादविवाद स्पर्धा (क्लॅश  ऑफ माईंड्स) , बीजीएमआय मोबाईल, फोटोग्राफी (टॅलेंट हंट), कूल आर्ट  आणि वक्तृत्व स्पर्धेचा समावेश होता.

पिंपरी चिंचवड आणि पुणे विभागातील विविध महाविद्यालयातील 771 पेक्षा (Alandi) जास्त विद्यार्थ्यांनी Scifari 2.0 मध्ये सहभाग घेतला.

Alandi : भागवत एकादशीनिमित्त माऊलीं मंदिरात आकर्षक फुलसजावट

विजेते आणि उपविजेत्यासाठी ट्रॉफीसह आकर्षक रोख बक्षिसे आणि सर्वांसाठी सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान आणि संगणक विज्ञान विभागाचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी समन्वयक आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

विद्यार्थी समन्वयक आणि स्वयंसेवकांनी Scifari 2.0 भव्यदिव्य  बनवण्यासाठी त्यांची प्रतिभा आणि सर्जनशीलता दाखवली. शिक्षक समन्वयकांसह विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्याची खात्री केली.

कार्यक्रमाचे संयोजन विज्ञान आणि संगणक विज्ञान विभागाच्या प्राध्यापिका संगीता बोरडे, प्राध्यापिका पल्लवी घोलप यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी  मृणालिनी शिंदे, तेजस्विनी चौरे यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापिका पल्लवी घोलप यांनी केले.

विज्ञान आणि संगणक विज्ञान विभाग प्रमुख डॉ. संगीता बिराजदार,सन्माननीय प्राचार्य डॉ. बी.बी. वाफारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. याबाबत माहिती राहुल बाराथे (Alandi) यांनी दिली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.