Alandi : लग्नाच्या अमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार लैगिक अत्याचार करण्यात आले. तसेच लग्न न करता फसवणूक करण्यात आली. ही घटना आळंदी येथे घडली.

वसीम खलील इनामदार (रा. आठ मुठा रोड, खडकी, मूळगाव राजीवनगर, बाजार रोड, सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 21 वर्षीय तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जानेवारी 2018 ते 15 जून 2019 या कालावधीत आळंदीजवळील एका लॉजवर घडली. फिर्यादी तरुणी खडकी परिसरात ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेत होती. त्यावेळी आरोपीने तिच्याशी मैत्री करीत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून आळंदी जवळील एक लॉजवर नेले. तिथे तिच्यावर वेळोवेळी लैगिक अत्याचार केले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माने याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.