Shravani Somvar: पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त आळंदीत शिवलिंग दर्शनासाठी भाविकांनी गर्दी

एमपीसी न्यूज: आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त आळंदी येथील प्राचीन शिव मंदिरात म्हणजेच सिद्धेश्वर मंदिरात शिवलिंग दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. (Shravani Somvar) पहाटे पासून इच्छुक भाविक या मंदिरात शिवलिंगाचा शिवाभिषेक करत होते. सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी स्थानिक नागरिकांबरोबरच विविध भागातील भक्तांनीही गर्दी केली होती. श्रावणी सोमवार निमित्त देवस्थान ने सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार म्हणून सिद्धेश्वर मंदिरा शेजारीच वेगळी दर्शन व्यवस्था केली होती.

 

 

आज हजारो भाविकांनी या सिद्धेश्वर मंदिरातील शिवलिंगावर भक्ती भावपूर्वक बेल,तांदूळ वाहिले. आळंदीत ज्ञानदेवांच्या जन्मापूर्वीही सिद्धेश्वर हे शंकराचे स्थान प्रसिद्ध होते. (Shravani Somvar) ‘सिद्धेश्वरा ची आळंदी म्हणून पूर्वी आळंदी प्रसिद्ध होती. संतांनी विविध अभंग ग्रंथातही सिद्धेश्वराचे महात्म्य सांगितले आहे. संत नामदेव आळंदीला भगवान शंकराचे सिद्धपीठ आहे असे म्हणतात. तर त्या ठिकाणी 84 सिद्ध ऋषी एकत्र येतात.

 

PCMC Hospital’s : महापालिका रुग्णालयातील वाढीव दराची आजपासून अंमलबजावणी

 

आळंदी हे प्राचीन शिव पीठ आहे. तसेच विविध ग्रंथ पुरणामध्ये आळंदीतील या शिवपीठाचा उल्लेख आढळतो. यंदा श्रावणात चार सोमवार येत आहे. (Shravani Somvar) श्रावण सोमवारी शिवप्रभूंची मनोभावे पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, दुःख दारिद्रय दूर होते. अशी धार्मिक मान्यता आहे. श्रावणात शिव पूजेला खूप मोठे महत्त्व आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.