Alandi News : आळंदी येथील श्री खंडोबा मंदिरात माघ पौर्णिमेनिमित्त खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ

एमपीसी न्यूज : आळंदी येथील श्री खंडोबा मंदिरात माघ पौर्णिमे (Alandi News) निमित्त खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी माघ पौर्णिमे निमित्त श्रींना नारळ वाहून नैवेद्य दाखविले.यावेळी भाविकांनी श्रींना पुष्प व पुष्पहार अर्पण केले.

Pune News : सहलीसाठी 34 विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या बसचे ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले मुलांचे प्राण

मंदिरा मध्ये भाविकांनी धार्मिक रूढी परंपरेने तळी भंडार केला. तसेच चाकण जवळील मेदनकरवाडी मध्ये माघ पौर्णिमेच्या दिवशी श्री खंडेबा उत्सवा निमित्ताने आळंदी परिसरातील भाविकाने आपल्या श्रेद्धेसह,वाजंत्र्यासह वाजत गाजत झेंडा हातात घेत नृत्य करत परंपरेने त्या (बगाडाचे) बैलगाड्याचे (Alandi News) मेदनकरवाडीच्या दिशेने आळंदी मधून प्रस्थान केले. श्री खंडोबा उत्सवा निमित्त परंपरेने बारा गाड्यांचा कार्यक्रम मेदनकरवाडी मध्ये होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.