रविवार, जानेवारी 29, 2023

Alandi News : स्कोडा व्होक्स वॅगन कंपनीच्या प्रतिनिधींची इंद्रायणी हॉस्पिटलला भेट

एमपीसी न्यूज : आळंदी येथील इंद्रायणी हाॅस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट हाॅस्पिटलला जग प्रसिद्ध स्कोडा व्होक्स वॅगन कंपनीच्या उच्च व्यवस्थापनातील (Alandi News) डॉ. जीरी प्रोकाॅप, इव्हा मॅकोव्हा, ल्युसी या जर्मन प्रतिनिधीनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे समवेत स्थानिक चाकण प्लाटचे  डाॅ. मनोज पवार, डाॅ.  अभय कुलकर्णी, डॉ. आर. आर जोशी टीम मध्ये होते. 

स्कोडा व्होक्स वॅगन टीमने हॉस्पिटलला सदिच्छा भेट देत येथील रुग्णालयाचे होत असलेल्या प्रभावी उपचार, यंत्रणा, रुग्णालयातील विविध उपचाराचे युनिट्स, आरोग्य विषयक सेवा सुविधां, या पुढील उपाय योजना, रुग्णालयाची प्रस्तावित इमारत, आरोग्य सेवा आदींची माहिती जाणून घेत आरोग्य विषयक उपचारां बाबत संवाद साधला.

Rajesh Deshmukh : पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’

यावेळी येथील रुग्णालयात आरोग्य विषयक सेवा सुरु झाल्या पासून आता पर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा आढावा रुग्णालय तर्फे देण्यात आला. येथील सर्व सामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे रुग्णालय म्हणून या हॉस्पिटलचे नावलौकिक  राज्यात वाढलेले आहे. राज्य परिसरातून तसेच पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. राज्य सरकारने देखील रुग्णालयास पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

यावेळी इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट हॉस्पिटलचे वतीने शासनाच्या गोरगरिबांसाठी असलेल्या आरोग्य विषयक सेवा सुविधा, सवलतीं मध्ये उपचार होत असल्याचे सांगीतले. (Alandi News) यावेळी या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अनिल पत्की, डाॅ. संजय देशमुख, डॉ. नीती गोसावी व हॉस्पिटल मधील कर्मचारी वर्ग  उपस्थित होते.याबाबत ची माहिती अर्जुन मेदनकर यांनी दिली.

Latest news
Related news