Alandi : टपरी चालकाला न विचारता बडीशेप पुड्या घेतल्यावरून वाद; दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – टपरीमधून टपरी चालकाला न विचारता बडीशेपेच्या पुड्या घेतल्या. याबाबत विचारणा करणाऱ्या टपरी चालकाला दगडाने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 3) रात्री नऊच्या सुमारास मरकळ रोड येथे घडली.

चंद्रशेखर भरत रॉय (वय 25, रा. धानोरे, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आकाश गावडे (रा. सोळू, ता. हवेली) आणि त्याचा मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आकाश आणि त्याचा मित्र, चंद्रशेखर यांच्या टपरीवर गेले. त्यांनी चंद्रशेखर यांना न विचारता टपरीतून बडीशेपेच्या पुड्या खिशात घातल्या. याबाबत चंद्रशेखर यांनी आकाशकडे विचारणा केली. याचा राग मनात धरून आकाश याने त्याच्या मित्रांसोबत मिळून चंद्रशेखर आणि त्यांच्या भावाला दगडाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये चंद्रशेखर आणि त्यांचा भाऊ जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.