Alandi: सिद्धबेट संवर्धनासाठी आळंदी नगरपरिषदे मार्फत विशेष लक्ष

एमपीसी न्यूज -सिद्धबेट संवर्धनासाठी आळंदी नगरपरिषदे मार्फत गेल्या काही (Alandi)कालावधीत विशेष लक्ष दिले गेले आहे. वृक्षांना नियमित पाणी देणे , गवत काढणे, झाडांवर बुरशीनाशक फवारणी अशी कामे पालिके मार्फत केली जात आहेत.तसेच वृक्षांना सेंद्रीय खत ही देण्यात आले आहे.वृक्ष संवर्धनाने येथील परिसर हिरवळला  आहे.

पालिके मार्फत सिद्धबेट परिसरातील अनावश्यक असलेले मोठे गवत व तेथील इतर (Alandi)परिसराची स्वच्छता ही आवश्यकता पडल्यास  जेसेबी च्या साह्याने तर कधी कर्मचाऱ्यांद्वारे केली जाते.

Moshi : मोशीत सुसाट्याच्या वाऱ्यानं होर्डिंग कोसळलं, सुदैवाने जिवीतहानी नाही

सिद्धबेट येथील प्रवेशद्वारा  लगतचा मोठा परिसर

तेथील लहान मोठ्या विविध वृक्षा मुळे लक्षवेधी ठरत आहे.तसेच  नियमित गवतांची स्वच्छता केल्याने पर्यटक किंवा भाविक यांना येथील वृक्षांच्या शीतल छायेत  बसता येते.व वारकरी विद्यार्थी सुद्धा मृदुंग वाजवण्याचा सराव ,गायनाचा सराव येथे करतात. व ज्ञानेश्वरी ,हरीपाठ ,भगवतगीता इ. पाठांतर करताना या परिसरात दिसतात.येथील परिसर विविध वृक्षांनी हिरवळा असून अनेकांचे लक्ष वेधून घेतो.यामुळे अनेक नागरिक या परिसरात छायाचित्रे काढतात.

सकाळी व सायंकाळी काही नागरिक नियमीत पणे वॉकिंग साठी येथे येतात.सिध्दबेटास आळंदी ,केळगाव ग्रामस्थ  व विविध संस्था यांचे सहकार्य  लाभत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.