Alandi : ‘शासन आपल्या दारी’ अभियान योजनेला आळंदी शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज : आळंदी येथील फ्रुटवाला धर्मशाळेमध्ये 27 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत महाराजस्व अभियान (Alandi) अंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी शहर राष्ट्रवादीने आयोजन केले होते. या योजनेला आळंदी शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी राष्ट्रवादी चे नेते डी.डी. भोसले पाटील,माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पा.माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पा. खेड तालुका राष्ट्रवादी युवकचे रोहन कुऱ्हाडे आळंदी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सौरभ गव्हाणे, निसार सय्यद आरिफ शेख निखिल बनसोडे, संकेत पाटील दादासाहेब नाळे, राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष पुष्पाताई कुऱ्हाडे, उज्वला चौधरी, गौरी गोळे व राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी या अभियान योजनेचा लाभ एकूण 368 नागरिकांनी घेतला. विविध लाभार्थी यांची आकडेवारी – (Alandi)

1) उत्पन्न दाखले – 67

2)नवीन रेशनकार्ड – 54

3) दुबार रेशनकार्ड – 38

4) मतदार नाव नोंदणी फाॅम एकूण – 78

5) संजय गाधी निराधार योजना – 20

6) आधार कार्ड लिंक – 89

7) ग्रामीण रुग्णालय जन्म मृत्यू दाखला -12

8) मॅरेज सर्टिफिकेट- 10

Pune : …तर गुन्हेगारीकडे वळालो असतो – अनिकेत कांबळे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.