Alandi : शेतात जाण्याच्या रस्त्यावरुन पती-पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज – गावाच्या हद्दीतील रस्त्यामधून ट्रॅक्टर घेऊन जात असताना चौघांनी मिळून पती व पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 22) दुपारी खेड तालुक्यातील सोळु येथे घडली.

हिरामण भिकू चौधरी (वय 36, रा. गोलेगाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भरत जंगल चौधरी, मिना भरत चौधरी, चांगुणा गोडसे व विकास भरत चौधरी (सर्व रा. गोलेगाव, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिरामण हे त्यांच्या पत्नीसोबत ट्रॅक्टर घेऊन शेतामध्ये नांगरणीसाठी चालले होते. त्यावेळी चारही आरोपींनी त्यांचा रस्ता अडवून शेतामध्ये जाण्यास नकार देत शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी यांनी हा रस्ता आमचा पण आहे’ असे म्हटले.

याचा राग येऊन आरोपी विकास चौधरी हा फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेला. तसेच फिर्यादी यांच्या पत्नीला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.