BNR-HDR-TOP-Mobile

Alandi : आळंदी पालखी सोहळ्याचे मॅनेजमेंट गुरु श्रीधर सरनाईक यांचा मानपत्र देऊन गौरव

0

एमपीसी न्यूज- ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे माजी व्यवस्थापक ,पालखी सोहळ्यातील प्रमुख मॅनेजमेंट गुरु श्रीधर सरनाईक यांच्या 61 व्या वर्षानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या वतीने त्यांना गौरव निधी, मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी आळंदी परिसरातील सेवाभावी संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, देहू संस्थान समिती,अभिष्टचिंतन गौरव समिती, ब्रम्हवृंद आळंदी, आळंदी ग्रामस्थ महिने महावारकरी, फडकरी, दिंडी प्रमुख आदींच्या वतीने अभीष्टचिंतन सोहळ्यात मानपत्र, स्मृतिचिन्ह, पुणेरी पगडी, ज्ञानेश्वरी व संत तुकाराम गाथा, तुळशीहार, गौरव निधी देऊन उत्साहात सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यास आळंदीचे माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगराध्यक्ष शारदा वडगावकर, माजी नगरसेवक रंगनाथ रानवडे, डी. डी. भोसले पाटील, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त अजित कुलकर्णी, देहू देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, स्वामी महाराज मठाचे प्रमुख बाळू काका गोखले, सुमन सरनाईक, नारायण महाराज जाधव, निलेश महाराज लोंढे, संजय महाराज घुंडरे, नरहरी महाराज चौधरी, पांडुरंग वरखडे, जनार्धन पांढरे, माउली मंदिराचे व्यवस्थापक माउली वीर, सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे, वेदमूर्ती श्रीकांत चितळे गुरुजी, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, उमेश बिडकर आदींसह विविध संस्थान, मठ, मंदिरे, धर्मशाळा, दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते.

श्रीधर सरनाईक यांचे जीवन कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. त्यांना श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या वतीने ६१ हजार रुपये, मानपत्र शाल, श्रीफळ, तुळशीहार, माऊलींची ग्रंथराज ज्ञानेश्वरी, संत तुकाराम गाथा, स्मृतिचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी विविध मान्यवरांचे हस्ते गौरव निधी देऊन सरनाईक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरनाईक यांनी 11  हजार रुपये श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानला देणगी दिली. अनेक वर्ष आळंदी देवस्थानमध्ये व्यवस्थापक म्हणून सेवा रुजू केली. आळंदी पंढरपूर पालखी सोहळ्यातील व्यवस्थापन गुरु म्हणून ते वारकरी संप्रदायात परिचित आहेत. अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करीत अनुभव कथन करीत कार्य परिचय करून दिला.

अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त माउली मंदिरात श्रींचे पादुकांची पूजा, कीर्तन हरिनाम गजरात, महाप्रसाद वाटप झाले. या सोहळ्यास वारकरी संप्रदायातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्याचे नियोजन श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या वतीने करण्यात आले. यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी ,सदस्य यांनी परिश्रम घेतले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement