Alandi: आळंदी मध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – आळंदी येथील इंद्रायणी काठी असलेल्या(Alandi ) श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम नवमी निमित्त मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती.श्रीराम मंदिरात आकर्षक फुलसजावट करण्यात आली होती.

सकाळी श्रींची पूजा,अभिषेक करण्यात आला.दुपारी बारा(Aland) नंतर श्रीराम जनमोत्सवेळी राम मंदिरात भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.व भाविकांना श्रींचा प्रसाद देण्यात आला.यावेळी अनेक भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले.

तसेच माऊली मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.श्रीराम जन्मोत्सव निमित्त ह भ प डॉ.नारायण महाराज जाधव यांची कीर्तन सेवा मंदिरात पार पडली.श्रीराम जन्मोत्सवावेळी भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली..व भाविकांना प्रसाद देण्यात आला.यावेळी ॲड राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथ,देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.

Bhosari : शाळेला पुस्तक विक्री करताना पुस्तक कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून दोन लाखांची फसवणूक

आळंदीतील कुऱ्हाडे आळी व वडगांव रोड येथील श्री राम मंदिरात सुद्धा मोठ्या उत्साहात श्री रामनवमी साजरी करण्यात आली.

आळंदी मध्ये श्रीराम जन्मोत्सव निमित्त आज संध्याकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान आळंदी देवाची यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.