Alandi : आळंदीमध्ये राज्य ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय 58 वे वार्षिक अधिवेशन संपन्न

एमपीसी न्यूज : – आळंदी येथे दि. 20 व  21 रोजी  दोन दिवसीय महाराष्ट्र राज्य ग्रंथालय (  Alandi )  संघाचे राज्यस्तरीय 58 व्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन फ्रुटवाले धर्मशाळेत  करण्यात आले होते.समाजाची जडणघडण होण्यात साहित्याचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे.महाराष्ट्राची साहित्य संस्कृती टिकवणे व वाढवण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालये अत्यंत मोलाचे कार्य करत आहेत.

 

Today’s Horoscope 22 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

या अधवेशनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन , ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन ,कवी संमेलन,साहित्य चर्चा ,परिसंवाद चर्चासत्र ,संत साहित्यावर प्रबोधन अश्या क्रमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमावेळी अनेक मान्यवरांना सन्मान चिन्ह व ग्रंथ,पुस्तक देऊन सन्मानीत करण्यात आले.

 

या महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या सहकार्याने आळंदी येथे  संपन्न झाले.यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय,नाशिक, मराठवाडा,अमरावती,कोकण,नागपूर, हिंगोली व पुणे विभाग ग्रंथालय संघ,वारकरी संप्रदायातील मान्यवर , आळंदीतील  मान्यवर मंडळी व विविध क्षेत्रातील मान्यवर या अधिवेशनास (  Alandi ) उपस्थित होते.

 

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share