Alandi : ज्वेलर्सच्या दुकानातून 60 हजारांचे दागिने लंपास

stole 60,000 pieces of jewelery from a jeweler's shop : ही घटना 23 जुलै रोजी मरकळ रोड, आळंदी येथे 'एस बी ज्वेलर्स' या दुकानात घडली.

एमपीसी न्यूज – ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या दोन चोरट्यांनी दुकानातून 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 23 जुलै रोजी मरकळ रोड, आळंदी येथे ‘एस बी ज्वेलर्स’ या दुकानात घडली.

गणेश अशोक तरटे (वय 36, रा. मरकळ रोड, आळंदी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरटे हे मरकळ रोड, आळंदी येथे असलेल्या एस बी ज्वेलर्स या दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करतात.

_MPC_DIR_MPU_II

23 जुलै रोजी त्यांच्या दुकानात एक अनोळखी पुरुष आणि त्याच्यासोबत एक महिला आली. दोघेही ग्राहक बनून दागिने घेण्याच्या बहाण्याने दुकानात आले होते.

चोरट्यांनी दुकानातून 60 हजार रुपये किमतीचे 12.640 ग्राम वजनाचे दोन पदरी सोन्याची चेन, त्यात तीन काळे मणी असलेले गंठण चोरून नेले.

घटना घडल्यानंतर दोघांनी दुकानातून दागिने चोरून नेल्याची शंका तरटे यांना आली. त्यामुळे त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यातील फुटेज तपासले असता दोन्ही चोरट्यांनी दुकानातील कामगारांची नजर चुकवून दागिने चोरले असल्याचे निष्पन्न झाले.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1