Alandi : आळंदीत माघी गणेश जयंती निमित्त जय्यत तयारी

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये 25 जानेवारी (Alandi) रोजी श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने शहरातील विविध भागांमध्ये शहरातील गणेश मंडळाची जय्यत तयारी दिसून येत आहे. शिवतेज मित्र मंडळाने गणेश जयंती व येणाऱ्या प्रजासत्ताक दिना निमित्ताने शिवतेज चौकातील गणेश मंदिरात आकर्षक अशी फुल सजावट केली आहे.

तसेच, श्री गणेश जयंती निमित्त गणेश याग व महाप्रसादाचे आयोजन येथे करण्यात आले आहे. श्रींची मिरवणूक आयोजित केली आहे. पीसीएमटी बसस्टॉप जवळ जुन्या पुलाखाली श्री गणेश मंदिर आहे. तिथे जय गणेश ग्रुपच्या वतीने सकाळी 7 वाजता श्रींचा अभिषेक, दुपारी 1 ते सायंकाळी 6 वाजता गणेश याग व महापूजा, रात्री 8:30 वाजता महाआरती असे आयोजन करण्यात आले आहे.

Natu Natu Oscars 2023: ऑस्कर जिंकण्यासाठी ‘RRR’ सज्ज

तसेच (Alandi) माऊलीं मंदिरातील गणेश मंदिरात, अखिल भाजी मंडई मंडळ, ज्ञानराज मित्र मंडळ, अमरदीप मित्र मंडळ, श्री दत्तनगर प्रतिष्ठान यांनी सुद्धा श्री गणेश जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.