Alandi : लाखो वारकऱ्यांच्या सोई सुविधां करिता प्रशासन तयारीला

एमपीसी न्यूज- संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज (Alandi )पालखी प्रस्थान सोहळा 11 दिवसांवर येऊन ठेपला आहे.पालखी प्रस्थान सोहळ्याला लाखो भाविक अलंकापुरी मध्ये दाखल होत असतात.त्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज कमिटी ,नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन यांचे नियोजन कार्य व  बैठक चर्चासत्र चालू आहेत.

वारकरी भाविकांना सोई सुविधा  देण्यासाठी  प्रशासन सज्ज होत असताना दिसून येत आहे.नदी पलीकडे बस स्थानकाच्या येथे मोबाइल शौचालय आणले गेले असून त्यातील काही शौचालय जुन्या पुला जवळ व इंद्रायणी नगर रस्त्यावर इंद्रायणी नदी जवळ  (हवेली हद्दीत ), चाकण रस्त्याजवळील सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूस,माऊलीं बागे जवळील बाह्य मार्ग रस्त्यावर  ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेच ते भाविकांच्या सुविधेसाठी शहरात विविध ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.

MPC News Podcast 31 May 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

पोलीस स्टेशन मध्ये  मंडप व्यवस्थेचे कार्य चालू आहे. तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी पालखी सोहळा रथाच्या दुरुस्ती चे कार्य चालू असल्याचे दिसून येत आहे.पालखी सोहळ्या निमित्ताने प्रशासनाने  आपले कार्य योग्यरित्या पार पाडण्यासाठी शहरात वेग पकडल्याचे दिसून येत आहे.

 या काही पुढील दिवसात शहरात पोलीस मदत केंद्रे,नागरिकांना सुचनेसाठी मदत कार्यासाठी साउंड  व्यवस्था,पालिके मार्फत वारकरी भाविकांच्या सोयी सुविधां करिता पाण्याच्या टँकरची व्यवस्था, आवश्यक तिथे सर्वत्र विद्युत प्रकाश व्यवस्था,आरोग्य सुविधा केंद्र,शहरातील सर्व हालचालींवर लक्ष रहावे यासाठी सी सी टीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच इतर सोई सुविधांचे नियोजन चालू आहे. तसेच पालिकेचे या काळात 24 तास स्वच्छता कार्याचे नियोजन आहे.

लाखो भाविकांच्या सोई सुविधेसाठी प्रशासन सज्ज होत आहे.तरी आज सुध्दा दि.31 रोजी  पुन्हा इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात फेसळलेली दिसून येत (Alandi ) होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.