BNR-HDR-TOP-Mobile

Alandi : दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात दुचाकी चालवून समोरच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मागून धडक देणा-या दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 5 जून रोजी रात्री नऊच्या सुमारास च-होली येथे घडला.

दीपक कडू ढिवरे (वय 23, रा. हनुमानवाडी केळगाव, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी रात्री नऊच्या सुमारास दीपक त्याच्या बजाज डिस्कव्हर (एमएच 22 / ए बी 8467) मोटारसायकलवरून चाकण-आळंदी रोडने जात होता. च-होली येथे त्याने त्याच्या समोरच्या दुचाकीला (एमएच 14 / एके 1703) धडक दिली.

या अपघातात समोरच्या दुचाकीवरील चालक ज्ञानेश्वर वामनराव टोंगराज (वय 24) हा किरकोळ जखमी झाला. तर दीपक हा गंभीर जखमी झाला. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातच दीपकचा मृत्यू झाला.

.