Alandi : नळ मोडल्याचा जाब विचारत केला महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – गच्चीवरील नळ मोडल्याचा जाब विचारत महिलेचा एकाने विनयभंग केला. तसेच महिलेला जिन्यावरून ढकलून दिले. यामध्ये महिला जखमी झाली. ही घटना 4 जुलै रोजी केळगाव रोड येथे घडली.

तुकाराम महाराज बोडके (रा. केळगाव, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोडके याच्या गच्चीवरील नळ फिर्यादी महिलेकडून मोडला. याचा जाब विचारत बोडके याने महिलेला शिवीगाळ केली. तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. बोडके याने महिला जिन्यावरून ढकलून दिले. यामध्ये महिलेच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.