Alandi : राज्यस्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत किडज् पॅराडाईज शाळेचे यश

एमपीसी न्यूज – जिल्हा क्रीडा संकुल अलिबाग येथे झालेल्या दि. 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत आळंदीच्या काळे काँलनीतील किडज् पॅराडाईज स्कूलची ईश्वरी जपे हिने 14 वर्षाखालील 24 किलो वजन गटात  सुवर्ण  पदक पटकाविले.

तिची पंजाब येथे होणाऱ्या जानेवारीत राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. शाळेचे संस्थापक अनंत काळे, शाळेचे संचालकनवनाथ काळे आणि अँड सचिन काळे,शाळेचे मुख्याध्यापिका विद्युत सहारे यांनी कौतुक केले.

संचालक  अँड सचिन काळे म्हणाले की, ईश्वरी जपे या विद्यार्थिनीला माझ्या आणि शाळेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करणा असल्याचे सांगितले. शाळा शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते.  आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ही केली असे त्यांनी सांगितले. नगर येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत तिला सुवर्णपदक मिळाले होते. क्रिडाशिक्षक संदेश साकोरे आणि चेतन ठाकुर यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.