Alandi : श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त फुलसजावटीचे काम अंतिम टप्प्यात

एमपीसी न्यूज : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 22 नोव्हेंबर रोजी 726 वा संजीवन समाधी सोहळा (Alandi) संपन्न होणार आहे. यानिमित्ताने माऊली मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलसजावट करण्यात येणार आहे.

मंदिरामध्ये फुलसजावट कामगार त्यानिमित्ताने कामे करत आहेत. गुलाब, अष्टर, झेंडू व इतर फुले, वस्तू यांपासून आकर्षक अशी फुलसजावट करण्यात येत असून ती अंतिम (Alandi) टप्प्यात आली आहे.

याबाबतची माहिती देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.